Clean Toilet Challenge | टॉयलेटसेवा अॅप सत्र २ ची सुरुवात उद्यापासून | घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची माहिती
Clean Toilet Challenge | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व टॉयलेटसेवा (Toilet Seva) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील उपलब्ध सार्वजनिक शौचालयाची ठिकाण सुविधांसह माहिती देणाऱ्या टॉयलेटसेवा अॅप सत्र २ (Toilet Seva App 2) ची सुरुवात उद्यापासून करण्यात येणार आहे. महापालिकेचे स्वच्छता ब्रॅन्ड अॅम्बेसिडर डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)
पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता श्री. अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले असून या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results थे filtering करणेz उदाहरणार्थ – वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, इस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १९८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी
नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे. दिनांक २२/०६/२०२३ रोजी महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते या Toilet
घे लॉचिंग करण्यात आली होती व ते नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात आले होते.
या १५ शौचालयांमधून तीन उत्कृष्ट शौचालय निवडले जातील. सदर स्पर्धेचा कालावधी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ असा असणार आहे. एकूण १०० गुणांकरिता Toilet Seva App Rating / मानांकन ३० गुण, Toilet Seva App वापर ३० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण (FACES Parameters / मापदंड)- ४० गुण हे स्पर्धेचे निकष असतील.
स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सफाई कर्मचारी आयोग प्रतिनिधी इत्यादी सदस्य असणार आहेत व विकेंद्रित स्तरावर मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी इत्यादी सदस्य असणार आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष राहतील व मुख्य खात्याच्या स्तरावर केंद्रीय समिती चे अध्यक्ष उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन असणार आहेत. परीक्षणाबाबत सदस्यांमध्ये मतभिन्नता अढळल्यास अंतिम निर्णय अध्यक्षांचा असेल.