महिला अत्याचारा वरून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकार वर निशाणा
पुणे : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अत्यंत अहंकारी, खुनशी व मुख्यतः महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व वेळ प्रसंगी त्यांचे समर्थन करणारे हे विकृत सरकार आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाने आयोजित केलेल्या विराट महिला महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी कॅंटोनमेंट मतदारसंघाचे आमदार सुनीलभाऊ कांबळे, माजी. मंत्री. दिलीप कांबळे, मा.आमदार .जगदिश मुळीक, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील, प्रीती सुनिल कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, शहर चिटणीस कोमलताई शेंडकर,.माधुरीताई गिरमकर, सुर्वर्णा भरेकर, उज्वला गौड, महिला मोर्चाच्या अध्यक्षा. दिप्तिताई पाटोळे, महेशजी पुंडें अध्यक्ष कॅ.म.संघ, मा.नगरसेवक धनराजभाऊ घोगरे मा.नगरसेवक उमेशभाऊ गायकवाड
मा.नगरसेवक दिलिप भाऊ गिरमकर सचिनभाऊ मथुरावाला,उपाध्यक्ष पुणे कॅ.बोर्ड., कालिंदातासौ.लक्ष्मीकाकु घोडके, सुधिर जानजोत नगरसेवक सर्व आघाडीचे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात महिला अत्याचाराची विविध उदाहरणे प्रस्तुत करत ठाकरे सरकार हे महिलांना असुरक्षित करते आहे असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले. शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप होऊनही संपूर्ण पोलिस खाते त्याच्या समर्थनार्थ काम करत आहे. तसेच वडगाव शेरी येथील शाळेत मुली वरती झालेल्या चाकू हल्ल्यात शाळेची कोणतीच जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याच वेळेस सरकारची आरती ओवाळणाऱ्या पोलीस खात्यात अनेक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांच्यामागे समाजाने व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय सुषमा स्वराज्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी ही सामान्य माणसाची आणि कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तिची ओळख कोणी एका नेत्याच्या नावामुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी महिला सक्षमीकरणाला आपल्या घरातून सुरुवात करावी असे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिलांनी करून तळागाळातल्या महिलांपासून उच्चशिक्षित महिलांना या मेळाव्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक उपस्थित केले आहे त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन आमदार सुनील भाऊंनी केले.
यावेळी दलित इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महिला आघाडीच्या प्रमुख महिला उद्योजक निर्माण होण्यासाठी कार्यरत असलेल्या सीमा कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टी रा.स्व. संघाच्या विचारधारेनेच चालत असून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे परंपरा या पक्षात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. महिला आरक्षण नसताना भारतीय जनता पार्टीमध्ये विजयाराजे सिंधिया, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, उमा भारती इत्यादी महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे, याचे स्मरण त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात कर्तृत्ववान भारतीय महिलांना वैशिष्ट्यपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमा घेऊन एकेक कार्यकर्ते व्यासपीठावरती येत होती आणि त्यांना सर्वांनी एकत्रित अभिवादन केले.
अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या या मेळाव्यास हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी निश्चित केलेल्या योजनांची माहिती व त्याचा लाभ कसा घ्यायचा याबाबतही प्रदर्शनी लावण्यात आली होती. या कार्यक्रमांमध्ये छोट्या आनंदी बोराडेने सादर केलेला जिजाऊंच्या कथेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश वंदनेने आरंभ झालेल्या या कार्यक्रमात सर्वत्र महिलांचा अत्यंत उत्साहाने वावरत होता. या महिला मेळाव्याच्या निमित्ताने विविध मान्यवर, डॉ.उषा तपासे मॅडम,(सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय), मिनल विक्रम रुपारेल (समाजसेविका),तेजा कांबळे(महिला बचतगट संघटक)वंदना विलास दवे(लघु उद्योजिका), अंबिका मांगिलाल शर्मा (जेष्ठ समाजसेविका), वंदना पराडकर(प्राणी मित्र), डॉ इरेन जुडा (आर्मी डॉक्टर) डॉ दिप्ती भास्कर बच्छाव, मनिषा शिंदे, कोमल एकनाथ शिंदे (राष्ट्रीय खेळाडू)अन्य महिलांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल त्यांना सुषमा स्वराज पुरस्काराने गौरवण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS