Blood Donation Camp | खून देना अहिंसा है | १५ ऑगस्टला पुण्यात महाराष्ट्र अंनिस कडून रक्तदान शिबिराचे आयोजन
Andhshradhha Nirmoolan Samiti – (The Karbhari News Service) – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या बलिदान दिनानिमित्त महा. अंनिस पुणे शहर शाखेने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे यंदाचे चौथे वर्ष असून हे शिबिर १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार संघाजवळील एस एम जोशी सभागृह, नवी पेठ येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती शाखेचे कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले यांनी दिली.
रक्त आणि रक्तातील घटक हे मनुष्यासह सर्वच प्राण्यासाठी प्राणाइतकेच आवश्यक आहेत. पण हिंसक लोक जनतेला रक्तबंबाळ करून लोकांचे प्राण घेतात. मात्र सुजाण नागरिक रक्त देऊन अनेकांचे प्राण वाचवतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानी आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानाशी रक्तदानाचे थेट नाते आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन अहिंसा, मानवतावाद वृद्धिंगत करावा, असे आवाहन विशाल विमल यांनी केले आहे. ‘खून करना हिंस है, खून देना अहिंसा है’ हे या रक्तदान शिबिराचे घोषवाक्य आहे, असेही विशाल यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी विशाल विमल 7276559318, स्वप्नील भोसले 9823208584 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
COMMENTS