बाणेर-बालेवाडी संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करणार!
नगरसेवक अमोल बालवडकर यांचे नागरिकांना आश्वासन
पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बाणेर बालेवाडीतील विविध सोसायटींमध्ये स्मार्ट पथदिवे खांब आणि हायमास्ट लाईटचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निधीतून हा खर्च करण्यात आला आहे. शिवाय बालवडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. बालवडकर यांनी यावेळी सांगितले कि येणाऱ्संया काळात संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करण्यात येईल.
विविध सोसायटीमध्ये पथदिवे आणि हायमास्ट लाईट चे उद्घाटन
प्रभागातील मधुबन सोसायटी, सफिरे पार्क, भाग्य अपार्टमेंट, गोल्डन ट्रेलीज, परफेक्ट 10, पल्लाझो, कॉनकॉर्ड पोर्टिया, गिनी विविआना, मानस हेरिटेज, मधुकोष, ऑरा, अस्टोनिया, मोंट वेर्ट कोर्सिका, निर्मिती झिऑन, द लेबर्नुम, सिद्धी आणि आजूबाजूच्या सर्व सोसायटींचा यामध्ये समावेश आहे.
यासोबतच, कूल होम्स, परितोष सोसायटी, द्वारका साई पॅरामाऊंट, ओर्विक, वाटिका, 7 अव्हेन्यू, अटलांटिस या सोसायटींमध्येही उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
येणाऱ्या काळात प्रभागातील विविध भागांमध्ये देखील अशाच प्रकारचे एल.ई.डी.पथदिवे बसवून संपूर्ण प्रभाग प्रकाशमय करण्यात येईल असे आश्वासन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यावेळी दिले.
COMMENTS