Archana Patil Award | अर्चना पाटील महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

HomePune

Archana Patil Award | अर्चना पाटील महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

Ganesh Kumar Mule Aug 23, 2025 3:04 PM

Archana Patil : अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी
Archana Patil : प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन
PMC : लहुजी वस्ताद फिटनेस क्लब होणार सील : मुख्य सभेत निर्णय 

Archana Patil Award | अर्चना पाटील महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

 

Archana Patil BJP  – (The Karbhari News Service) – माजी नगरसेविका आणि भाजप नेत्या अर्चना पाटील यांना लोकमत समूहा कडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडन मध्ये अभिनेता सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी अर्चना पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, लंडन येथे लोकमत तर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात “लोकमत महाराष्ट्ररत्न – २०२५ या पुरस्काराने माझा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही, तर जबाबदारीचा क्षण आहे. ‘लोकमत महाराष्ट्र रत्न’ हा सन्मान माझ्या वैयक्तिक प्रवासाचा नाही,तर माझ्या प्रभागातील जनतेच्या प्रेमाचा आणि त्यांच्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे.

आजवरचा माझा सामाजिक-राजकीय प्रवास संघर्षमय होता,पण त्या संघर्षातून मला माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या माझ्यावर असणाऱ्या प्रेमाने मला बळ दिले. हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर माझा प्रभाग, कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात. हा सन्मान त्यांच्या कष्टांना, त्यांच्या स्वप्नांना समर्पित आहे. हा बहुमान मला आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. असेही पाटील म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: