Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
Amol Balwadkar – (The Karbhari News Service) – ज्ञानदीप मंगल कार्यालय, पाषाण येथे अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने ‘खेळ रंगला पैठणीचा’ महिलांचा मेळावा आणि महिलांसाठी मनोरंजन म्हणून ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास सुमारे तीन हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शविला असून अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय यांनी महिलांचा आनंद द्विगुणित केला.
तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान बालेवाडी परिसरातील दिव्यांग सहकारी श्री. प्रमोद लहाने यांना हॅंडीकॅप बाईक भेट स्वरूपात देण्यात आली.
यावेळी प्रत्येक महिलेस आकर्षक भेट वस्तू आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले. लकी ड्रॉ स्पर्धेच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस TVS Scooty Zest अयोध्या कदम यांना देण्यात आले. तसेच दुसरे बक्षीस सॅमसंग LED TV सौ. कल्पना संजय मुरगूडकर, तिसरे बक्षीस LG फ्रिज सौ. जनाबाई शामू थोपे, चौथे बक्षीस Godrej वॉशिंग मशीन सौ. रुक्साना पाशान यांना आणि पाचवे बक्षीस फिलिप्स चे मिक्सर सौ. रेणुकाताई निर्मल यांना देण्यात आले.
या कार्यक्रमास कोथरूड परिसरातील सर्व माता भगिनींनी अतिशय उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद लुटला.
COMMENTS