Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘मॉर्निंग वॉक विथ आबा ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!  | तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद

HomePolitical

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘मॉर्निंग वॉक विथ आबा ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद! | तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद

Ganesh Kumar Mule Oct 27, 2024 9:13 PM

Pune Municipal Corporation | डीपी नुसार पुणे शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करण्याची मागणी 
Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!
Aba Bagul Parvati Vidhansabha Constituency | आता आबा बागुलांना विधानसभेत घेऊन जाणार | विजय वडेट्टीवार

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘मॉर्निंग वॉक विथ आबा ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

| तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद

 

Parvati Vidhansabha – (The Karbhari News Service) – पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी रविवारी तळजाई टेकडी येथे मतदारांशी संवाद साधला.यावेळी आबा बागुल यांच्या ‘मॉर्निंग वॉक विथ आबा ‘ ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Pune News)

तळजाई टेकडी येथे क्रिकेट महर्षी सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी संपूर्ण कुटुंबीयांसह मित्रपरिवारासमवेत नागरिकांची भेट घेतली.त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी आबा बागुल म्हणाले की, आज लोकांनी माझ्या उपक्रमाचे स्वागत केले आणि तुम्हाला पक्षाने संधी दिली नाही म्हणून काय झाले? जनता आहे ना इथे. तुम्ही निर्धास्त रहा आणि लढा.आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि राहणार आहोत.आता ही निवडणूक परिवर्तनाची आहे.अशी ग्वाही नागरिकांनी दिल्याने गहिवरून आले आहे. त्यातही माझी पहिली निवडणूक ही अपक्ष म्हणूनच होती.

जनतेने मनावर घेतले तर काय होते,याचा दाखला तेंव्हा विजयाने मिळाला होता.याची आठवण नागरिकांनी करून दिली आणि यंदा ‘पर्वती ‘ मध्ये परिवर्तन घडणार आणि तुम्ही आमचे हक्काचे आमदार म्हणून निवडून येणारच. या मतदारांच्या भावना ,त्यांचा ठाम विश्वास पाहता मला निवडणूक लढायला आणखी प्रोत्साहन , बळ मिळाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0