वाघिरे महाविद्यालयात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार स्वराज्य महोत्सव हर घर तिरंगा अभियान या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वात मोठा ऑनलाइन राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या व्यक्तींचा फोटो अल्बम या गिनीज रेकॉर्डसाठी राबवलेल्या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सहकारी तसेच ओतूर आणि परिसरातील माध्यमिक विद्यालय व नागरिकांचे ४०२८ इतक्या मोठ्या प्रमाणात फोटो अपलोड करण्यात आले. तसेच १५ ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रीय छात्रसेनेचे संचालन तसेच उपस्थित सैनिकांचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. दिनांक १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ वाजता महाविद्यालय परिसरात महाविद्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत या उपक्रमाचे ही आयोजन करण्यात आले. सदर सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा उल्लेख केला तसेच भावी पिढीला राष्ट्राबद्दल आपल्या कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे असेही नमूद केले. तसेच राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व गावचा इतिहास लेखन स्पर्धा इत्यादी उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली.
वरील उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, डॉ. व्ही.एम शिंदे, डॉ के डी सोनावणे तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा अमृत बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना समवेत कार्यक्रमाधिकारी डॉ अमोल बिबे डॉ निलेश काळे तसेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ निलेश हांडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ उमेशराज पनेरु व प्रा बाळासाहेब हाडवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले