Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून शाळेस भेटी : भेटीमध्ये शाळेची पाहणी करून नाविन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती 

HomeपुणेEducation

Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून शाळेस भेटी : भेटीमध्ये शाळेची पाहणी करून नाविन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती 

Ganesh Kumar Mule Apr 21, 2022 3:57 PM

Student Welcome | ‘बालआनंद मेळाव्यास'(विद्यार्थी स्वागत) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 
Education | शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे

नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून शाळेस भेटी

: भेटीमध्ये शाळेची पाहणी करून नाविन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती

भोसरी : येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकानी नुकतीच देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूल शाळेस संस्थापकांच्या पूर्वपरवानगीने भेट दिली.

नारायण हट शिक्षण संस्था अंतर्गत(२०२२-२३) सुरु होणा-या इंग्रजी/सेमी इंग्रजी प्रायमरी स्कूल संदर्भात वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन माहिती घेतली जात असून त्यातून नव्याने सुरू होणाऱ्या शाळेत कशाप्रकारे उपक्रम राबवायचे याचे नियोजन नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकांकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलला नुकतीचभेट देण्यात आली.

अभंग इंग्लिश मीडियम स्कूल देहू परिसरात नावाजलेली इंग्लिश माध्यमाची शाळा असून नाविन्यपूर्ण उपक्रम साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या शाळेस भेट देऊन येथील सर्व गोष्टींची माहिती संचालकांनी घेण्याचा प्रयत्न केले.
शाळेमध्ये राबवण्यात येणारे कला, क्रीडा, संगीत, अभिनय, विद्यार्थी बैठक व्यवस्था, पाण्याची, टॉयलेटची व्यवस्था, ग्राउंड, इमारत, शाळेत उपलब्ध साहित्य, इतर भौतिक सुविधा, ॲडमिशन प्रक्रिया, शिक्षक स्टाफ भरती प्रक्रिया, प्राचार्य नेमणूक प्रक्रिया, व्यवस्थापकीय, प्रशासकीय, गोष्टी, इत्यादी बाबतीत सखोल माहिती संस्थापक, प्राचार्य, यांच्याकडून घेण्यात आली. व प्रत्यक्ष शाळेची पाहणी करण्यात आली.

सृजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कंद, सचिव, विकास कंद, शाळेच्या प्राचार्य, डॉ. कविता अय्यर यांनी नारायण हट शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांचे यथोचित स्वागत केले. व सर्व गोष्टी ची माहिती प्रत्यक्ष पाहणीतून संस्थाचालकांना दिली.

नारायण हट शिक्षण संस्थेच्या संचालकांनी वेगवेगळ्या गोष्टींविषयी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान कारक मार्गदर्शन प्राचार्य, अध्यक्ष, यांनी केले.
अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य डॉ. कविता अय्यर यांनी शाळेच्या व्यवस्थापनाबाबत बहुमोल असे मार्गदर्शन केले. व संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील कंद यांनी शाळेच्या उभारणीपासून इतर सर्व बाबींविषयी सखोल मार्गदर्शन केले. आणि नारायण हट शिक्षण संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या शाळा भेट कार्यक्रमासाठी अंकुश राव गोरडे, डॉ. वसंतराव गावडे, मा. मुकुंदराव आवटे, मा. संदीप बेंडुरे, मा. रोहिदास गैद, सौ. रोहिणी पवार, सौ. ‌शोभा आरुडे, सौ. उज्वला थिटे, डॉ. बाळासाहेब माशेरे मा. श्री.सुनील कंद, मा. श्री. विकास कंद, डॉ कविता अय्यर हे उपस्थित होते.
सुजन संस्था व अभंग शाळेच्या सहकार्याबद्दल आभार प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी मानले. अभंग इंग्लिश मीडियम शाळेतील सर्व उपक्रम नव्याने सुरू होणाऱ्या शाळेमध्ये राबविण्यात येतील असे नारायण हट शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी ठरवले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    उल्हास पानसरे 3 years ago

    स्तुत्य उपक्रम आणि सर्व संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन

DISQUS: 0