Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद!

खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद

Homecultural

Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद!

Ganesh Kumar Mule Aug 17, 2024 8:27 PM

Inauguration of flyover connecting Pashan-Sus | राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण
Balewadi : बालेवाडीतील प्रगतशील शेतकरी मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे निधन 
Amol Balwadkar: Balewadi : बालेवाडीत 38 गाळ्यांची अद्ययावत भाजी मंडई : शाश्वत सर्वांगीण विकास हेच भाजपचे लक्ष्य

Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद!

 

Amol Balwadkar – (The Karbhari News Service) – अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा महिलांचा मेळावा कोथरूड पंडित फार्म, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यासोबतच महिलांसाठी मनोरंजन म्हणून मंगळागौर आणि लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शविला. लाडक्या बहीण योजनेतील सहभागी महिला, तसेच कोथरूड परिसरातील अनेक महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.

लकी ड्रॉ मध्ये सौ. सुलभा गजानन धुमाळ यांना वॉशिंग मशिन, सौ. अपूर्वा नितीन तापकीर यांना मिक्सर, सौ. पुष्पा अशोक पवार यांना फ्रिज, सौ. सारिका तावरे यांना टिव्ही आणि सौ. शुभांगी पेडणेकर यांना टू व्हीलर मिळाली. दरम्यान लकी ड्रॉ स्पर्धेत बक्षिसे जिंकल्याबद्दल या सर्व भगिनींनी विशेष आनंद व्यक्त करून आभार मानले. तसेच सहभागी महिलांना देखील आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

एकूणच कोथरूड परिसरातील सर्व माता भगिनींनी अतिशय उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवून मनसोक्तपणे आनंद लुटला. “सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिका फेम माधवी निमकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय यांनी देखील महिलांमध्ये उत्साह भरला आणि धमाल मनोरंजन करत हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

यापुढेही असेच निरनिराळे उपक्रम राबविण्यासाठी मी कटिबद्ध असेल असे आश्वासन यावेळी महिलांना दिले आणि सर्वांशी संवाद साधला. तसेच बक्षीस विजेत्या महिलांचे देखील अभिनंदन केले. याप्रसंगी अमोल बालवडकर फाउंडेशनचे सर्व सभासद आणि असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0