सॅलिसबरी पार्क येथे पन्नाप्रमुख, कार्यकर्ता मेळावा संपन्न  : नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची संकल्पना

Homeपुणे

सॅलिसबरी पार्क येथे पन्नाप्रमुख, कार्यकर्ता मेळावा संपन्न : नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची संकल्पना

Ganesh Kumar Mule Aug 29, 2021 2:03 PM

Pahalgam Terror Attack | पुणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त 
FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!
Deepali Dhumal : PMC election : माझी खात्री आहे; महापौर राष्ट्रवादीचाच होणार : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचा दावा
सॅलिसबरी पार्क येथे पन्नाप्रमुख, कार्यकर्ता मेळावा संपन्न
: नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची संकल्पना
पुणे. समर्थ बूथ अभियान अंतर्गत प्रभाग क्र. २८ ब मधील नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशी माहिती नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, राजेश पांडे ,पुणे शहर संघटन सरचिटणीस दत्ता खाडे,  यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बूथ रचना, समिती याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात आयोजक श्रीनाथ भिमाले, श्रीपाद ढेकणे, कुलदीप सावलळेकर,जितेंद्र पोळेकर, विश्वास ननावरे, गणेश शेरला, शैलेश देशपांडे, राजू कदम, सरदेशपांडे काका,सुशिल लोंढे यांच्यासह प्रभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.