शिक्षकांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य   : महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचे प्रतिपादन   : शिक्षक गौरव समारंभ संपन्न..!

Homeपुणे

शिक्षकांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य : महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचे प्रतिपादन : शिक्षक गौरव समारंभ संपन्न..!

Ganesh Kumar Mule Sep 14, 2021 5:31 PM

Nanded City Property tax PMC | नांदेड सिटी टाऊनशिप मधील लोकांना कर भरावा लागणार | महापालिकेकडून कर आकारणी सुरु | 30 जानेवारी पर्यंत PT3 अर्ज भरून देण्यासाठी मुदत
Pune Fights Corona : शहरात कोरोना रुग्णांची वाढ कमी होईना : पुणेकरांच्या चिंतेत वाढ! 
Raksha Bandhan With Parvati Police| समाज रक्षणासह महिलांच्या संरक्षणासाठी ‘त्यांनी ‘ दिले वचन ! | पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन !

शिक्षकांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य

: महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचे प्रतिपादन

: शिक्षक गौरव समारंभ संपन्न..!

पुणे: सालाबादप्रमाणे या वर्षीही शिक्षक दिनाचे औचित्य साधून वारजे माळवाडी परिसरातील सर्व सन्माननीय शिक्षकांचा प्रा.डॉ. सुधाकर जाधवर सर यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव केला. देशाची उज्वल भावी पिढी घडविणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान सोहळा शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अविस्मरा बॅक्वेट हॉल येथे संपन्न झाला. शिक्षकांचा गौरव होत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव बघून आंनद झाला. समाजासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, शिक्षकांचा गौरव सोहळा आपण दरवर्षी साजरा करत असतो. शिक्षकांना प्रोत्साहित करणारा हा अभिनव सोहळा यापुढेही असाच सुरू ठेवू. असे आश्वासन विरोधीपक्ष नेत्या, तथा नगरसेविक दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिले.

शिक्षकांना पाठिंबा देणारे वातावरण आज तयार करणे गरजेचे – प्रा. जाधवर

विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गौरव समारंभात जाधवर बोलत होते. यावेळी वारजे परिसरातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, व शिक्षकांचा सन्मान जाधवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे कार्यक्रमाचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.

जाधवर म्हणाले, जबाबदार समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा मानसन्मान करत असताना या शिक्षकांना पाठिंबा देणारे वातावरण आज तयार करणे गरजेचे बनले आहे. ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणूनच समाजाला चांगली दिशा देण्याचे काम जो करतो तो शिक्षक असे म्हंटले जाते.

मागील दहा वर्षात शिक्षकांना मानसन्मान देण्याची पद्धत कमी झाली. पण त्या आगोदरच्या काळात शिक्षकांकडे आदर भावनेने पाहिले जात होते. पूर्वी शिक्षक प्रेमा बरोबरच छडीच्या धाकावर मुलांना घडवत पण आता मुलांना हात लावला तरी पालक शाळेत येतात. त्यामुळे मुलांना घडवण्याचे साधनच शिक्षकांच्या हातातून काढून घेतले आहे. जो माणूस घडवतो तो शिक्षक अस स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, शिक्षकांनी जबाबदारी घेतली आहे म्हणून समाज आज जिवंत आहे. शिक्षक हे जबाबदार नागरिक देशासाठी घडवत असतात. आज ऑनलाईन शिक्षणाच्या काळात घरी मुलांना सांभाळणं किती आवघड आहे हे पालकांना कळले आहे, त्यामुळे मुलं सांभाळणं शिक्षकांनीच जाणो अस अनेक जन म्हणताना दिसत आहेत. मुलांवर मेहनत घेऊन त्यांना आदर्श नागरिक बनवणाऱ्या शिक्षकांना खरचं सॅल्यूट करावासा वाटतो. शिक्षकांचे तसेच विनाअनुदानित शिक्षकांचेही प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही जगताप म्हणाले.

दिपाली धुमाळ  म्हणाल्या शिक्षक शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर आदर्श व्यक्तिमत्व उभे राहते. समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान कारण हे आमचं कर्तव्य आहे असं समजून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी. दा. पिंगळे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0