बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार उचल
: स्थायी समितीचा निर्णय
: समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
पुणे: महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका आणि बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार रुपये उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘सन २०१२ पासून या कर्मचार्यांना दरवर्षी सणासाठी अडीच हजार रुपये उचल दिली जाते. वाढलेला खर्च लक्षात घेऊन या वर्षीपासून त्यात दुपटीने वाढ करून पाच हजार रुपये उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. दरमहा वेतनातून दहा समान हप्प्यात त्याची वसुली केली जाते. या योजनेचा ४९३ बालवाडी शिक्षिका आणि ३३८ बालवाडी सेविका अशा एकूण ८३१ कर्मचार्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी ४१ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.’
: डुक्कर नियंत्रणासाठी निधीची तरतूद
पुणे महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटकी डुक्करांच्या नियंत्रणासाठी फॉर्मर चॉर्इस या संस्थेच्या निविदेला स्थायी समितीने मंजूरी दिली असल्याची माहिती स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, ‘फॉर्मर चॉर्इस संस्थेने एका डुकरासाठी १४२५ रुपये इतका दर दिला आहे. लिलावापोटी या संस्थेकडून महापालिकेला १४२५ रुपये प्राप्त होणार आहेत. अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार भटके आणि मोकाट डुकरे पकडण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या वाहनांमार्फत कारवार्इ करण्यात येते. या कारवार्इत पकडण्यात आलेल्या डुकरांची अधिकृत कत्तलखान्यात विल्हेवाट लावण्यात येते. ३१ जुलै २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत ४० हजार ३८६ डुकरे पकडण्यात आली. लिलावापोटी महापालिकेला सुमारे ६० लाख ७० हजार रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली.’
: फुरसुंगीत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
कचरा डेपोमुळे पिण्याचे पाणी दूषित झालेल्या आणि महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या फुरसुंगी गावात आवश्यकतेनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ९९ लाख ८२ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
COMMENTS