पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी  : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार

HomeपुणेPMC

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार

Ganesh Kumar Mule Sep 16, 2021 3:32 PM

PMC Assistant Commissioner Dr. Jyoti Dhotre | पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती धोत्रे यांचे निधन! 
Omprakash Divate IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती | राज्य सरकारकडून आदेश जारी
PMC Solid Waste Management Department | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी संदीप कदम!

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी

: राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार

पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या प्रश्नाबाबत बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यास तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी आदरणीय अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करतो.

: नुकतीच उपमुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बुधवारी मंत्रालयात अजितदादा पवार यांच्या दालनात बैठक झाली होती. या वेळी अजितदादांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनास पुढील आठवडाभरात राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा शब्दही दिला होता. परंतु, शब्द दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावला असून, महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.
 अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत. त्यांचा शब्द म्हणजे, आपले काम होणारच याची प्रचिती पुन्हा एकदा आली. त्याबद्दल, अजितदादा पवार यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शहराध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0