टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न!  – 1000 कोटींचा टप्पा केला पार  – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती

HomeपुणेPMC

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न! – 1000 कोटींचा टप्पा केला पार – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Aug 27, 2021 2:20 PM

Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा
VIP Road in pune : पुण्यातील जवळपास 20 रस्ते झाले VIP
Pune Municipal Corporation’s ranking in health schemes has moved from 4th to 3rd

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न!

– 1000 कोटींचा टप्पा केला पार
– कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती
पुणे. प्रॉपर्टी टॅक्स हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. टॅक्स च्या उत्पन्नातून महापालिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. टॅक्स ने नुकताच 1 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. या आर्थिक वर्षात पालिकेला टॅक्स मधून 27 ऑगस्ट पर्यंत 1001 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती कर संकलन आणि कर आकारणी विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
– 30 जून पर्यंत होती 15% सवलत
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स हा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मानला जातो. मागील वर्षी या विभागाने महापालिकेला 1700 कोटींचे उत्पन्न मिळवून दिले होते. चालू आर्थिक वर्षात देखील पहिल्या 5 महिन्यात महापालिकेला टॅक्स मधून 1001 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स भरावा या हेतूने महापालिकेच्या वतीने पहिल्या दोन महिन्यात कर भरणारांसाठी 15% सवलत दिली जाते. याबाबत कानडे म्हणाले,  यावर्षी ही मुदत वाढवून 30 जून केली होती. याचा फायदा शहरातील 4 लाख 4 हजार 275 लोकांनी घेतला. यातून महापालिकेला 303 कोटींचे उत्पन्न मिळाले. तर सवलतीची रक्कम 50 कोटी होती. त्याशिवाय आपल्या सोसायटीत गांडूळ खत प्रकल्प, छोटे कचरा प्रकल्प व बायोगॅस प्रकल्प करणाऱ्या नागरिकांना करात 5 ते 10% सवलत दिली जाते. 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत याचा 1 लाख 42 हजार 238 लोकांनी फायदा घेतला. यातून महापालिकेला 497 कोटींचे उत्पन्न मिळाले. असे ही कानडे यांनी सांगितले.
– मागच्या वर्षी मिळाले होते 790 कोटी
कानडे यांनी सांगितले की, महापालिकेला मागच्या वर्षी 1 एप्रिल ते 27 ऑगस्ट या कालावधीत 790 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. सुमारे 5 लाख 54 हजार 491 नागरिकांनी कर भरला होता. तर या वर्षी याच कालावधीत सुमारे 6 लाख 26 हजार 72 नागरिकांनी 1001 कोटींचा कर भरला. महापालिकेला यामुळे दिलासा मिळाला आहे.
– उत्पन्न वाढीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील – रासने
याबाबत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की, पुणे महापालिकेने आज एक हजार कोटी रुपये मिळकतकराचे संकलन पूर्ण केले. कोरोनाच्या आपत्तीत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न घटत असताना पुणेकरांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे उद्दिष्ट साध्य करता आले. महापालिकेने गेल्या पाच महिन्यांत सुमारे 2800 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या आर्थिक वर्षासाठी आम्ही सादर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे आम्ही 8370 कोटी रुपयांचे उदिष्ट निश्चित गाठू याचा विश्वास वाटतो. उत्पन्न वाढीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून मेट्रो, समान पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीरण, वाहतूक सुधारणा, बसेसची खरेदी, समाविष्ट गावांचा विकास अशी विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उभा करता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0