मूर्ती आमची किंमत तुमची :  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अनोखा उपक्रम

Homeपुणेमहाराष्ट्र

मूर्ती आमची किंमत तुमची : – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अनोखा उपक्रम

Ganesh Kumar Mule Aug 27, 2021 3:34 PM

Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा
PMC Pune | Mahavikas Aaghadi March | महाविकास आघाडी पुणे महापालिकेवर काढणार मोर्चा 
Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!

 मूर्ती आमची किंमत तुमची

– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अनोखा उपक्रम

पुणे. गणेशोत्सवात भाविकांना दिलासा देण्यासाठी ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ असा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात राबविण्याचे ठरविले आहे. सुमारे ४ हजार गणेशमूर्ती त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मनसेच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

कोरोना काळातील आर्थिक संकट आणि गणेशमूर्तीच्या जादा भावामुळे सर्वसामान्य नागरिकांना गणेशमूर्ती घेणे परवडणारे राहिले नाही. वाढत्या महागाईने गणेश उत्सव कसा करायचा ? असा प्रश्न सर्वसामान्य जनते समोर आहे. म्हणून मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठ येथे चार हजार गणेश मूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्वप्रकारच्या गणेश मूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील मात्र त्याची किंमत नागरिकांनी ठरवायची आहे. नागरिकांनी श्री गणेशाची मूर्ती घेतल्यानंतर मंगल कलशात ऐच्छिक देणगी टाकून मूर्ती घेऊन जायची आहे.

या उपक्रमाची सुरुवात येत्या सोमवारी (ता. ३०) दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे हे या उपक्रमास भेट देणार आहेत. हा उपक्रम रविवार पेठेतील संत नामदेव चौकात राबविण्यात येणार आहे, असे गवळी यांनी कळविले आहे.